Ranbir Kapoor : 'रामायण'मध्ये 'रामा'च्या भूमिकेसाठी रणबीर कपूरला का केलं कास्ट?; सीक्रेट झालं रिव्हिल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:05 PM2024-08-21T16:05:07+5:302024-08-21T16:21:05+5:30

Ranbir Kapoor : रणबीर कपूरला प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटातील रामाच्या भूमिकेसाठी रणबीरला का कास्ट करण्यात आलं यामागचं कारण समोर आलं आहे.

रणबीर कपूर आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत आणि आपलं दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. आता रणबीर 'रामायण'मध्ये दिसणार आहे.

या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्याचं शूटिंग आतापासूनच सुरू झालं आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अलीकडेच एका मुलाखतीत कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

रणबीर कपूरला प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटातील रामाच्या भूमिकेसाठी रणबीरला का कास्ट करण्यात आलं यामागचं कारण समोर आलं आहे.

द रणवीर शोच्या नवीन पॉडकास्ट दरम्यान, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी नितीश तिवारी यांच्या रामायणमधील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड का करण्यात आली याबाबत खुलासा केला आहे.

मुकेश छाब्रा म्हणाले की, "त्याच्या चेहऱ्यावर शांतता आहे आणि तिच हवी होती ना… नितेश (तिवारी) यांनी त्याच्याबद्दल खूप आधीच विचार केला होता. हा अतिशय योग्य निर्णय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल."

"अशा प्रकारच्या कास्टिंगसाठी खूपच प्रामाणिकपणा लागतो." याच दरम्यान त्यांनी रामायणचा सीक्वलही येऊ शकतो, असे देखील संकेत दिले आहेत. सध्या दुसऱ्या पार्टची कास्टिंग प्रोसेस सुरू आहे.

रामायणाच्या सेटवरील अनेक फोटोही लीक झाले होते. ज्यामध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी त्यांच्या भूमिकेत दिसले होते. ही फोटो पाहिल्यानंतर चाहते आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राजकुमार हिरानी यांच्या पुढच्या चित्रपटात रणबीर पहिल्यांदाच विक्रांत मॅसीसोबत काम करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत, मात्र याबाबत ऑफिशियल कम्फर्मेशन मिळालेलं नाही.