रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:58 PM 2020-08-26T16:58:46+5:30 2020-08-26T17:19:25+5:30
रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडचं सर्वात पॉप्युलर कपल आहे. दोघांची जोडी फॅन्सना पसंत येते. इतकेच काय तर त्यांच्या केमिस्ट्रीचीही नेहमी चर्चा होत असते.
दुसरीकडे जेव्हापासून रणबीर-आलियाने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता दोघांच्या लग्नाबाबत नवीन अपडेट आली आहे.
आधी रणबीर-आलियाचं लग्न डिसेंबरमध्ये होणार असल्याची चर्चा होती. पण आता असं होणार नाही. ईटी टाइम्सने सूत्रानेच्या हवाल्याने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, रणबीर आणि आलियाने हे वर्ष सोडून पुढील वर्षी लग्नाचा प्लॅन केला आहे. हा निर्णय कोरोनामुळे घेण्यात आलेला नाही. तर दोघांच्या प्रोफेशनल असायनमेंटमुळे घेतला आहे.
रणबीर आणि आलिया येणारे काही प्रोजेक्ट्समध्ये बिझी असणार आहेत. त्यामुळे त्यांनी डिसेंबरमधील डेट पुढे ढकलली आहे. आता हे कपल २०२१ मध्ये लग्न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाने लग्नाच्या लहंग्यासाठी डिझायनर सब्यसाचीला अॅप्रोच केलं होतं. पण आता लग्नाची डेट पुढे सरकली आहे. त्यामुळे आउटफिटचं प्लानिंगही होल्डवर ठेवलं आहे.
दोघांचेही फॅन्स दोघांना लग्नाच्या जोड्यात बघण्यासाठी आतुर आहेत. आलिया-रणबीरचं नातं दोघांच्याही परिवारांना मंजूर आहे. आलिया या कठिण काळात रणबीरच्या फॅमिलीसोबत ठामपणे उभी आहे.
अभिनेता ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर आलियाने रणबीर कपूर आणि त्याच्या परिवाराचा प्रत्येक वळणावर साथ दिली आहे. आलिया कपूर खानदानाच्या बरीच जवळची आहे. सर्वांसोबत तिचं चांगलं बॉन्डींग आहे.
आलियाला नेहमीच रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत गेट-टुगेदर आणि हॅंगआउट करताना बघितलं जाऊ शकतं. रणबीर आणि आलियाचा मोठा चाहतावर्ग आहे. अशात दोघांचं लग्न मोठ्या इव्हेंटपेक्षा कमी नाही.
रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे.