महिमा चौधरी - परदेस चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेला हा फ्रेश चेहरा सर्वांच्याच लक्षात आहे. रितू चौधरी असं तिचं खरं नाव.. पण तिला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आणणारे दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिचे नाव बदलून महिमा असं ठेवलं.जॉन अब्राहम - मॉडेलिंग पासून अभिनेता बनण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास करणा-या जॉनचे खरे नाव आहे फरहान अब्राहम.श्रीदेवी - सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचे खरे नाव आहे श्री अम्मा यंगेर अय्यपन..अजय देवगण - बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता अशी ओळखर असलेल्या अजयचे खरे नाव आहे विशाल देवगण.शिल्पा शेट्टी - बॉलिवूडची ग्लॅम गर्ल शिल्पा शेट्टीने तिच्या अदांनी मोहक हास्याने रसिकांना घायाळ केले. मात्र चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी शिल्पाचं खरं नाव होतं अश्विनी शेट्टी.मिथुन चक्रवर्ती - आय अॅम ए डिस्को डान्सर अशी ओळख मिरवत संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणा-या मिथुन चक्रवर्तींचे खरे नाव गौरंगा चक्रवर्ती आहे. मिथुनदांच्या ब-याच चाहत्यांनाही त्यांचे हे खरे नाव माहित नसेल.हृतिक रोशन - अप्रतिम नृत्य कौशल्य आणि तितकाच दमदार अभिनय करणा-या हृतिकचे खरे नाव हृतिक नागराथ असे होते. रोशन हे त्याच्या आजोबांचे नाव जे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनीच आडनाव म्हणून धारण केले.गुरूदत्त - प्यासा कागज के फूल साहिब बिवी और गुलाम यांसरखे अनेक यशस्वी चित्रपट नावावर असलेले निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वच भूमिका गुरूदत्त यांनी लीलया पार पाडल्या. एकेकाळी हिंदी चित्रपृ सृष्टीवर व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्याचं खरं नाव होतं वसंतकुमार शिवशंकर पदुकोण..नाना पाटेकर - आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे नाना पाटेकरांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर..किशोर कुमार - अभिनयापासून गायनापर्यंत सर्व आघाड्यांवर राज्य करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील व्हर्सेटाईल अभिनेता किशोर कुमार यांचे मूळ नाव होतं... आभास कुमार गांगुली.सनी लिओनी - पॉर्नस्टार ते बॉलिवूडमधील अभिनेत्री असा पल्ला गाठणारी सनी लिओनी ही मूळची पंजाबी कुडी असून तिचं खरं नाव आहे करनजित कौर व्होरा.राजेश खन्ना - हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग ऑफ रोमान्स नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे मूळ नाव होते जतीन खन्ना.कतरिना कैफ - बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेली कतरिना ही मूळची इंग्लंडमधील आहे. तिचे खरे नाव आहे केट टर्कोट्टे..अक्षय कुमार - बँकॉकच्या एका रेस्टॉरंस्टमधील शेफ ते आजचा बॉलिवूडचा खिलाडी कुमार असा प्रवास करणा-या अक्षयचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया..प्रीती झिंटा - नुकतीच विवाहबद्ध झालेल्या प्रीती झिंटाचे खरे नाव होते प्रीतम सिंग झिंटा.. मात्र बॉलिवूडमध्ये येताना तिने प्रीती झिंटा हे नाव धारण केले आणि तिच्या मूळच्या सौंदर्याला तिचे हे प्रीटी नाव अधिकच शोभून दिसले.दिलीपकुमार - १९४४ मध्ये ज्वार भाटा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाला सुरूवात करणारे बॉलीवूडचे अभिनयसम्राट दिलीपकुमार यांचे खरे नाव मोहंमद युसुफ खान..मधुबाला - ही पाहताच बाला कलिजा खलास झाला.. ही उक्ती सार्थ ठरवणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्यसम्राज्ञी म्हणजे मधुबाला.. तिचं मूळ नाव होतं मुमताज जेहान बेगम देहेल्वी.रजनीकांत - शिवाजी गायकवाड हे मूळचे मराठी नाव धारण असणारे सुपरस्टार आज रजनीकांत नावाने ओळखले जातात.रेखा - सुंदर चेहरा आणि तितकाच दमदार अभिनय करणारी रेखा म्हणजे मूळची भानुरेखा गणेशन.. दक्षिणेकडील नावाजलेले अभिनेते जेमिनी गणेशन यांची ती कन्या... हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिने नवे नाव धारण केले ते म्हणजे रेखा..!संजीवकुमार - आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवून रसिकांच्या मनावर गारूड करणारे संजीवकुमार यांची खरी ओळख म्हणजे हरिभाई जरीवाला...अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन हे बिग बी या नावाने सर्वांना परिचित आहेत.. मात्र त्यांचे मूळ नाव तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे खरे नाव होते इन्कलाब श्रीवास्तव.अनेक सेलिब्रिटींनी एक नवे नाव धारण करत बॉलिवूडमध्ये आपले नशीब उजळवले. त्यात दिलीपकुमार अमिताभ बच्चनन रजनीकांत या दिग्गजांपासून सनी लिओनी कतरिना कैफचा समावेश आहे. अशाच काही सेलिब्रिटींची ही खरी ओळख...