PHOTOS: सोनम कपूरच्या लेकाचा पहिला फोटो आला समोर, बाळाला पाहताच मावशीला कोसळलं रडू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:19 PM2022-08-22T19:19:50+5:302022-08-22T19:59:52+5:30

रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनमच्या बाळाची पहिली झलक दिसते आहे.

सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी शनिवारी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. (फोटो इन्स्टाग्राम)

मुलाच्या जन्मानंतर सोनम कपूरने सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केली. (फोटो इन्स्टाग्राम)

सेलिब्रेटींसह चाहत्यांनी सोनम कपूर, आजोबा झालेल्या अनिल कपूरवर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. (फोटो इन्स्टाग्राम)

आता सोनम कपूरच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

बहिणीच्या बाळाला पहिल्यांदा भेटल्यानंतर रिया कपूर भावूक झाली. या भेटीची काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनमच्या बाळाची झलक दिसत आहे. रियाने या फोटोंमध्ये इमोजी वापरून बाळाचा चेहरा लपवला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रियाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)