रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण! विवाहसोहळ्यात केलेलं असं काही की सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:04 PM2024-09-30T16:04:06+5:302024-09-30T16:23:20+5:30

रिचा चढ्ढा-अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रिचाने खास फोटो शेअर करुन एक विशेष गोष्ट सांगितली आहे (richa chadha, ali fazal)

रिचा चड्डा - अली फजल हे बॉलिवूडमधील चर्चेतील कपल. दोघंही सोशल मीडियावर विविध फोटो पोस्ट करुन चर्चेत असतात

रिचा चड्डा - अली फजल या दोघांनी त्यांच्या लग्नाचे खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यावेळी रिचाने खास गोष्ट सांगितली

रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रिचाने लग्नातले कधीही न दाखवलेले क्षण सर्वांना दाखवले आहेत

विशेष गोष्ट म्हणजे रिचा चड्डा - अली फजलचं लग्न संपूर्ण प्लास्टिक विरहीत होतं. प्लास्टिकच्या एकाही गोष्टीचा त्यांनी लग्नात वापर केला नव्हता

रिचा चड्डाने संपूर्ण प्लास्टिकविरहीत लग्न केल्याने सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण घालून दिलंय. सर्वजण या इको फ्रेंडली लग्नासाठी रिचा - अलीचं कौतुक करत आहेत

रिचा चड्डा - अली फजल या दोघांच्या आयुष्यात काहीच महिन्यांपुर्वी नवीन पाहुण्याचं आगमन झालं. रिचाने मुलीला जन्म दिला

सध्या रिचा चड्डा - अली फजल यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. दोघेही नुकतेच आई-बाबा झाल्याने मुलीसोबत ते फॅमिली टाईमचा अनुभव घेत आहे.