रिंकू राजगुरुने आकाश ठोसरसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिला 'तो' खास मेसेज, पाहा photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:20 PM2022-03-16T14:20:41+5:302022-03-16T14:49:00+5:30

सैराट या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनलेली रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी पुन्हा झुंडमध्ये एकत्र दिसली. याच चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटच्या निमित्ताने या दोघांचे खास फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत आणि त्यासोबत खास मेसेजही लिहिला आहे.

'सैराट' या चित्रपटातून संपूर्ण देशाला वेड लावणारे आर्ची आणि परश्या 'झुंड' च्या निमित्ताने पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांमध्ये 'झुंड' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सतत एकत्र दिसून आले आहेत.

नुकतंच प्रमोशन दरम्यानचे काही फोटो रिंकू आणि आकाशने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.

यामध्ये दोघांनीही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटो शेअर करत रिंकूने मजेशीर कॅप्शनसुद्धा दिलं आहे. या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे.

रिंकूने आकाश सोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'प्रत्येक फोटोमध्ये माझे हावभाव वेगळे आहेत,आणि हा मुलगा एकच आहे'.# FriendsForever

रिंकू आणि आकाशच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सैराट' या चित्रपटामुळे रिंकू आणि आकाश एका रात्रीत स्टार बनले होते. सध्या त्यांच्यात फारच बदल झालेला पाहायला मिळत आहे. (फोटो साभार- Instagram)