Bigg Boss Marathi 5 House Photos : काचेच्या महालासारखं सजवलेलं 'बिग बॉस मराठी'चं नवं घर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:02 AM2024-07-28T10:02:41+5:302024-07-28T10:15:56+5:30

आलिशान हॉल, गॉसिप करण्यासाठी खास कट्टा अन्…

'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व २८ जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे. यंदा स्पर्धक खेळाडूंची शाळा घेण्यासाठी रितेश देशमुख हा बिग बॉसच्या घराचा प्रमुख असणार आहे.

'बिग बॉस मराठी'चं घर कसं असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर प्रतिक्षा संपली असून घराचे फोटो समोर आले आहेत.

आम्ही तुम्हाला फोटोच्या माध्यमातून 'बिग बॉस मराठी'च्या घराची सफर घडवणार आहोत.

Bigg Boss च्या घराचं प्रवेशद्वार आणि त्यासमोरील उद्यानाचा भाग या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

चक्रव्यूह ही यंदाच्या पर्वाची थीम आहे.

Bigg Boss घरात कॅप्टनसाठी आलिशान खोली तयार करण्यात आली आहे.

Bigg Boss च्या घराला यंदा भन्नाट लुक देण्यात आलाय. काचेच्या महालासारखं डोळे दिपवणारे बिग बॉसचे घर आहे.

Bigg Boss च्या घरातील हे बाथरूम आहे. अनेकदा बाथरूममध्ये स्पर्धक गॉसिप करताना दिसतात.

Bigg Boss घरातील सदस्यांसाठी खास तयार करण्यात आलेली ही बेडरूम.

Bigg Boss च्या घरातील किचन. जेवण बनवण्याबरोबरच स्पर्धक इथे गॉसिपही करताना आणि भांडतानाही दिसतात.

Bigg Boss च्या घरातील खास आकर्षण असलेली ही जागा म्हणजे बाल्कनी.

हा Bigg Bossच्या घरातील गार्डन एरिया आहे.

Bigg Boss मराठीच्या यंदाच्या पर्वमध्ये प्रेक्षकांना एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अनुभवायला मिळेल.