Pretty on Pink! आकर्षक ड्रेसमध्ये सई ताम्हणकर दिसली खुपच स्टनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:56 IST2021-09-30T16:44:58+5:302021-09-30T16:56:48+5:30
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज यामुळे सई ताम्हणकर आधीपासूनच रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

अभिनयासोबतच तिच्या अदा आणि स्टाईलवर सारेच फिदा असतात.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली सई आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते.
ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही.
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो.
त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात.
नुकतेच तिने फोटोशूटमधील निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी आकर्षक ड्रेसमधला तिचा अंदाज फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास सईच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.