जाळ अन् धूर संगटच! निळ्या रंगाच्या साडीत रिंकूच्या फोटोशूटने केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 02:14 PM2024-06-26T14:14:42+5:302024-06-26T14:23:35+5:30

Rinku rajguru: रिंकूच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

उभ्या महाराष्ट्राला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आणि, पाहता पाहता लोकप्रिय झाली.

रिंकूने मराठीसह हिंदी वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.

अलिकडेच तिचा 'झिम्मा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात तिचा नवा अंदाजही चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे.

रिंकू बऱ्याचदा साडी नेसून किंवा मराठमोळ्या साजशृंगारात तिचं फोटोशूट करत असते.

रिंकूने यावेळी गडद निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

रिंकूच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.