बहीण जितकी ग्लॅमरस तितकाच साधा आहे भाऊ; तुम्ही पाहिलंय का रिंकू राजगुरुच्या सख्खा भावाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:15 AM2023-08-31T11:15:11+5:302023-08-31T11:22:02+5:30

Rinku rajguru:सिद्धार्थ प्रचंड साधा असून त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड आहे.

सैराट या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी सिनेमांमध्ये रिंकू झळकली आहे. इतकंच नाही तर तिने काही गाजलेल्या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे.

सोशल मीडियावर आज रिंकूचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे रिंकू सातत्याने या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

प्रोफेशनल लाइफसोबत रिंकू तिच्या वैयक्तिक जीवनातीलही काही किस्से, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.

काल सगळीकडे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. यात रिंकूने तिच्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या भावासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोच्या निमित्ताने पहिल्यांदाच चाहत्यांनी रिंकूच्या भावाला पाहिलं आहे.

रिंकू बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करते. मात्र, यावेळी तिने तिच्या भावासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

रिंकूला सख्खा भाऊ असून सिद्धार्थ असं त्याचं नाव आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावरही फारसा सक्रीय नाही.

एकीकडे रिंकू अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. तर, दुसरीकडे सिद्धार्थ क्रीडा क्षेत्रात करिअर करायचा प्रयत्न करतोय.

सिद्धार्थ प्रचंड साधा असून त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड आहे.