बिग बी ते हृतिक रोशन! बॉलिवूडच्या 'या' ४ सुपरस्टार्सचा इनकम टॅक्स वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:54 PM2022-07-25T14:54:36+5:302022-07-25T15:00:16+5:30

Bollywood celebs income tax amount: अक्षयने यावर्षी २९.५ कोटींचा टॅक्स भरला असून सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी म्हणून तो चर्चेत आला आहे.

अक्षय कुमार - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या सर्वाधिक इनकम टॅक्स भरल्यामुळे चर्चेत आहे.

अक्षयने यावर्षी २९.५ कोटींचा टॅक्स भरला असून सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी म्हणून तो चर्चेत आला आहे. अक्षयने वर्षभरात केवळ ५-६ चित्रपट केले आहे. इतकंच नाही तर त्याने पृथ्वीराज या चित्रपटासाठी ६० कोटी रुपये फी घेतल्याचं सांगण्यात येतं.

अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे मेगास्टार, शहेनशहा, बिग बी अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आजवरच्या कारकिर्दीत बिग बींनी असंख्य चित्रपट केले असून एका चित्रपटासाठी ते फी देखील तितकीच मोठी घेतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींनी २०१८-१९ या वर्षात ७० कोटी रुपये टॅक्स भरला होता.

सलमान खान- बॉलिवूडचा दबंग खान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. सलमानदेखील एका चित्रपटासाठी मोठी रक्कम आकारतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान प्रत्येक वर्षी ४४ कोटींच्या आसपास इनकम टॅक्स भरतो.

शाहरुख खान- दमदार अभिनयशैलीमुळे चर्चेत येणारा शाहरुख चित्रपटांव्यतिरिक्त प्रोडक्शन हाऊस वा अन्य उद्योगांमधूनही कमाई करतो.

शाहरुख वर्षाला जवळपास २२ कोटींचा टॅक्स भरतो.

हृतिक रोशन - बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशनची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. यावेळी तो इनकम टॅक्समुळे चर्चेत आला आहे.

हृतिक प्रत्येक वर्षी २५.५ कोटी रुपयांचा टॅक्स भरतो.