बजरंगी भाईजानमधील मुन्नी झालीय इतकी मोठी, आता दिसतेय भलतीच ग्लॅमरस !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:00 AM2021-05-22T08:00:00+5:302021-05-22T08:00:07+5:30

हर्षाली मल्होत्रा एक भारतीय बालकलाकार आहे. नुकतेच बजरंगी भाईजानमधील मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्राने काही फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

हर्षालीने बजरंगी भाईजानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून मुन्नी घराघरात पोहोचली आहे. (Photo Instagram)

या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेने रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. (Photo Instagram)

बजरंगी भाईजान या चित्रपटाआधी हर्षालीने काही मालिकांमध्ये काम केलं होते. यात 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि सावधान इंडिया या मालिकांचा समावेश आहे. (Photo Instagram)

हर्षालीने चित्रपट आणि मालिकांसोबतच काही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. (Photo Instagram)

बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. (Photo Instagram)

‘बजरंगी भाईजान’च्या सेटवर हषार्ली रिकाम्या वेळेत सलमान खान व कबीर खान यांच्या मोबाईलमध्ये बार्बी गेम्स तसेच टेबल टेनिस खेळायची. (Photo Instagram)

‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंग दरम्यान मोठ्या आवाजाने हर्षाली घाबरून जायची. त्यावेळी कबीर खान व सलमान खान दोघेही हषार्लीला अन्य गोष्टींमध्ये बिझी ठेवायचे. सीन समजला नाही तर हर्षाली थेट कबीर खान यांच्याकडे जायची आणि त्यांना सीनबद्दल विचारायची.Photo Instagram)