अभिनेत्रीने वयाच्या ६३ व्या वर्षी केला कहर, डीपनेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये घेतली रेड कार्पेटवर एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:08 PM2023-08-28T13:08:38+5:302023-08-28T13:39:58+5:30

मिस दिवा २०२३ फिनालेमध्ये स्पर्धकांची नाही तर या अभिनेत्रीचीच हवा

वय हा केवळ आकडाच असं अभिनेत्री संगिता बिजलानीकडे (Sangeeta Bijlani) बघून म्हणावं वाटेल. ६३ वर्षीय संगिता बिजलानी सध्या तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये तिने घेतलेल्या एंट्रीने सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या.

९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री संगिता बिजलानी या वयातही चाहत्यांना प्रेमात पाडत आहे. काल मुंबईत पार पडलेल्या मिस दिवा २०२३ च्या ग्रँड फिनाले कार्यक्रमात तिने हजेरी लावली. यावेळी तिने डीपनेक पिंक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने न्यूड मेकअप केला होता.

या लुकमध्ये तिने रेड कार्पेटवर एंट्री घेताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिने कॅमेऱ्यासमोर मस्त पोज दिल्या. तिचे रेड कार्पेटवरील फोटो, व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. ६३ व्या वर्षीही कोणी इतकं फिट आणि बोल्ड कसं असू शकतं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. नेटकऱ्यांनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलं.

संगिताचं सौंदर्य पाहून 'टाईमलेस ब्युटी' अशी कमेंट एकाने केली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफनेही तिच्या सौंदर्याची तारीफ करत 'एजलेस ब्युटी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. संगिता आणि जॅकी श्रॉफ दोघेही 'त्रिदेव' सिनेमात एकत्र दिसले होते.

संगिताला लहानपणीपासूनच ग्लॅमर वर्ल्डबाबत आकर्षण होतं. 1980 साली तिने मिस इंडियाचा खिताब जिंकला. यानंतर तिने मॉडेलिंग सुरु केली आणि हळहळू बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. मात्र ती कायमच प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली.

१९९६ मध्ये संगिताने क्रिकेटर मोहम्मद अजरुद्दीनसोबत लग्न केले होते. १४ वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. याआधी सलमान खानसोबतच्या अफेअरमुळे ती चर्चेत आली होती. १० वर्ष त्यांचं अफेअर होतं. दोघांचं लग्नही होणार होतं. पत्रिकाही छापल्या गेल्या. मात्र ऐनवेळी संगिताने नकार दिला होता.

संगिताने 1987 साली 'कातिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये आदित्य पांचोलीसोबत ती झळकली. संगिताने 'हथियार', 'योद्धा','इज्जत','युगांधर' सारख्या अनेक सिनेमात काम केले. त्रिदेव मधील 'ओए ओए' गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली होती.

संगिता सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच बॉलिवूडच्या अनेक इव्हेंट्समध्येही हजेरी लावते. नुकतंच तिची आणि सलमानची भेट चर्चेत आली होती. या भेटीत दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.