Sania Mirza Retires: सानिया मिर्झाने शेवटचा ग्रँडस्लॅम गमावला, तरीही मिळाली बक्षीसाची भली मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:11 AM2023-01-27T11:11:35+5:302023-01-27T11:25:57+5:30

सानिया-रोहन जोडीला उपविजेतेपदाचे किती पैसे मिळाले माहितीये?

Sania Mirza Retires, Australian Open: ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीचा पराभव झाला. ब्राझीलच्या राफेल मातोस आणि लुएसा स्टेफनी या जोडीने सानिया-रोहन जोडीला ७-६(७-२), ६-२ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीची ही फायनल मॅच प्रत्येक भारतीयासाठी खास होती, कारण ती स्टार सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची ग्रँडस्लॅम होती. सानियाने कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

सानिया फायनलमध्ये हरली, पण एवढे असूनही तिच्यावर पैशांचा पाऊस पडला. मिश्र दुहेरीत सानिया आणि रोहन उपविजेते ठरले. त्यांना मोठ्ठं बक्षीस मिळालं.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेत्याला म्हणजे सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीला बक्षीस म्हणून ८९ हजार ४५० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे इनाम म्हणजेच अंदाजे ५१ लाख ८६ हजार रुपये मिळाले.

अंतिम फेरीत पराभव होऊनही सानियाला तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात अविस्मरणीय असे बक्षीस मिळाल्याने भारतीयांनाही आनंद झाला. या मिश्र दुहेरीच्या फायनलमधील विजेत्याला ९१ लाख ४६ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. कौंटुबिक जबाबदारी, मुलाचे संगोपन आणि इतर काही वैयक्तिक गोष्टींमुळे तिला टेनिसला न्याय देता येत नव्हता, म्हणून तिने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे तिनेच सांगितले.