Sanju Rathod Ambani Wedding : संजू राठोडने सांगितला अंबानींच्या लग्नाचा अनुभव, खास पाठवली होती Fortuner

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 06:13 PM2024-08-07T18:13:12+5:302024-08-07T18:33:44+5:30

Sanju Rathod : 'आधी फ्रॉड वाटलं, पण जेव्हा Fortuner घ्यायला आली', कसा होता संजूचा अंबानींच्या लग्नातला अनुभव?

१२ जुलैला अनंत अंबानी-राधिका मर्चंट (anant ambani and radhika merchant wedding) यांचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. या लग्नाला केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील बॉलिवूड सेलेब्रिटी अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित होते.

या सर्व सेलेब्रिटींमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे मराठमोळ्या संजू राठोडने (Sanju Rathod). संजू राठोड अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात धमाकेदार परफॉर्मन्स देत सर्वांची मनं जिंकली.

आता नुकतंच संजूने 'माझा महाकट्टावर'शी बोलताना अबांनींच्या लग्न सोहळ्याचं आमंत्रणं (sanju rathod perform gulabi sadi at anant ambani) आल्यानंतरची भावना आणि लग्नातील अनुभव सांगितला.

लग्न सोहळ्याचं आमंत्रणं संजूला फ्रॉड वाटलं होतं. पण, अंबानींची फॉर्च्युनर गाडी घ्यायला आल्यानंतर त्याचा विश्वास बसल्याचं संजूने (sanju rathod on anant ambani and radhika merchant wedding) सांगितलं.

मुलाखतीमध्ये संजूने सांगितलं, 'लंडन, दुबई अशा ठिकाणी मला कॉन्सर्टसाठी ऑफर आल्या, मला लग्नात गाण्यासाठीही आमंत्रणं येत होती. पण मी एकदा मस्करीतच जी स्पार्कला म्हणालो की, अंबानींचं वैगरे आमंत्रण आलं तर करेल मी. त्यानंतर तीन चार दिवसांनी मला मेल आला'.

संजू म्हणाला, 'आपल्याला अंबानींच्या लग्नाला जायचं असल्याचं जी स्पार्क म्हटलं. पण, मला वाटलं की, हा माझी मस्करी करतोय. मग त्याने मला मेल दाखवला आणि मी शॉकच झालो. तेव्हाही मला वाटलं की, हे फ्रॉड असेल. त्यावेळी बोलणं वैगरे झालं आणि मग आमचं जायचं ठरलं. तरीही मला विश्वासच बसत नव्हता. शेवटपर्यंत वाटतं होतं हे फेक आहे.'

पुढे तो म्हणाला, 'पण, मग त्यांनी आम्हाला घ्यायला गाडी पाठवली. त्यांनी फॉर्च्युनर पाठवली होती. मी जी स्पार्कला म्हटलं की, अजून मोठी गाडी सांगायला हवी होती, अजून भारी वाटलं असतं. आम्ही ग्रामीण भागातले, अगदी साधं आयुष्य जगलो आहोत. त्यामुळे इथून तिथे जायचं ही आमच्यासाठी एक वेगळीच भावना होती. आम्ही जसं तिथे एन्ट्री घेतली. तर समोर रॅपर किंग बसलेला दिसला. त्याला पाहताच मी जी स्पार्कला म्हटलं की, कसं होणार आपलं. तेवढ्यात त्याची मॅनेजर आम्हाला त्याच्याकडे घेऊन गेली आणि म्हणाली की तुमचं गाणं एकत्रच आहे. मग तर मी अजून शॉक झालो'.

'त्यावेळी मी जी स्पार्कला आमच्या भाषेत म्हटलं की, 'जी स्पार्क काय करायचं रे, माझं डोकचं चालत नाहीये'. यावर जी स्पार्क म्हणाला, 'काही नाही तू फाडून टाक स्टेज'. मग मी म्हटलं, 'जाऊदे जे होईल ते आपण बघून घेऊ, आपण काही घाबरत नाही'. मग टॉपच्या आर्टिस्टसमोर रिहर्सल करतान कमीपणा वाटू नये म्हणून असा परफॉर्मन्स केला की जसा स्टेजवर करतो. त्यावेळी मला वन्समोअर मिळाला. यावर रॅपर किंगनेदेखील कौतुक केलं.

'त्यानंतर ज्या दिवशी मी माझा फरफॉर्मन्स होता, त्यादिवशी तर एक वेगळीच एनर्जी होती. सगळे सेलिब्रेटी समोर होते. तिथेही मला वन्समोअर मिळाला. तिथे मराठी गाणी सगळ्यांचं पाठ होतं, सगळे जण नाचताना ते गाणं गुणगुणत होते. खूप भारी वाटलं'.

संजूचं 'गुलाबी साडी' हे 2024 मधील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक आहे. लग्न असो वा ट्रेंडिंग रील, सगळीकडे या गाण्याचीच चर्चा राहिली.