Happy Birthday Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरचे 25 वे शतक आणि मुलगी साराचा जन्म, यावर्षी बनला अजब योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 04:57 PM2022-10-15T16:57:02+5:302022-10-15T17:08:42+5:30

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा 25 वर्षांची झाली.

Happy Birthday Sara Tendulkar: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा 25 वर्षांची झाली. सारा सोशल मीडियावर अतिशय ॲक्टिव्ह असते. तसंच तिनं आपला 25 वा वाढदिवस हंगेरीमध्ये साजरा केला. आपल्या मित्रांसोबत ती या ठिकाणी पोहोचली होती.

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. ती आता 25 वर्षांची झाली आहे. यंदा तिचा वाढदिवस आणि वडील सचिन तेंडुलकर यांच्या शतकांबाबत एक अजब योगायोग घडला आहे. हा योगायोग जाणून चाहत्यांनाही आश्चर्य वाटेल.

वास्तविक, जेव्हा साराचा जन्म ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता, त्यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये 25 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली होती. 9 ऑगस्ट 1997 रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत सचिनने त्याचे 25 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

ऑक्टोबर 1997 मध्ये मुलगी साराच्या जन्मापूर्वी सचिन तेंडुलकरने वनडे फॉरमॅटमध्ये 12 आणि टेस्टमध्ये 13 शतके झळकावली होती. सारा तेंडुलकर सतत सोशल मीडियावर कायमच व्हीडिओ फोटो शेअर करत असते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तसे पाहता आजवर एकट्या सचिनला शतके झळकावण्याचा पराक्रम करता आला आहे. या कारणास्तव हा योगायोग अधिकच खास बनतो.

सारा तेंडुलकरचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्यानंतर ती लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहे. सारा कधी मुंबईत राहते, तर कधी लंडनमध्ये असते. ज्याची माहिती ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

साराने अलीकडे अनेक फोटोशूट आणि अॅडशूट देखील केले आहेत. सारा तेंडुलकर लवकरच बॉलीवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत, परंतु अद्याप याविषयी कोणतीही पुष्टी झालेली नाही.