कुणीतरी येणार येणार गं! हिरवी साडी अन् फुलांचा साज; नेत्राचे डोहाळ जेवणाचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 03:52 PM2024-08-06T15:52:08+5:302024-08-06T15:57:36+5:30

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नेत्राच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

या मालिकेचं कथानक इतरांपेक्षा वेगळं असल्यामुळे तिला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका एक रंजक वळणावर आहे. या मालिकेत नेत्रा गरोदर असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

अभिनेत्री तितिक्षा तावडेने मालिकेत नेत्रा नावाचं पात्र साकारलं आहे. लवकरच अद्वैत आणि नेत्राच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

सध्या इंटरनेटवर नेत्राच्या डोहाळ जेवणाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये हिरवी साडी आणि त्यावर फुलांचा साज असा पेहराव तिने केला आहे.

नेत्राच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.