एक पोस्ट अन् कोटींची कमाई; 'हे' 5 कलाकार इन्स्टाग्राममधून करतात कोटयवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 06:26 PM2023-06-13T18:26:07+5:302023-06-13T18:40:45+5:30

Bollywood celebs: सिनेमा नव्हे इन्स्टाग्रामधूनही 'हे' 5 कलाकार करतात कोटयवधींची कमाई; आकडा पाहून डोळे होतील पांढरे

शाहरुख खान - बॉलिवूडचा बादशहा अर्थात शाहरुख खान याचा फॅनफॉलोअर्स किती मोठा आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे.

शाहरुख सिनेमा आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कोटयवधींची कमाई करतो. तो एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी १ कोटी रुपये फी घेतो.

अक्षय कुमार - तरुणांमध्ये अक्षयची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग इन्स्टाग्रामवर अधिक आहे.

अक्षय एका पोस्टसाठी १ कोटी रुपये घेतो.

रणवीर सिंग- आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत येणारा रणवीरदेखील एका पोस्टसाठी प्रचंड पैसे घेतो.

रणवीर एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी १ कोटी रुपये फी घेतो.

सलमान खान- बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचं देशासह विदेशातही चाहते आहेत. त्यामुळे त्याचा फॉलोअर्सही तितकाच तगडा आहे.

सलमान एखाद्या ब्रँडची पोस्ट शेअर करण्यासाठी ५० लाख रुपये घेतो.

अमिताभ बच्चन- बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे इन्स्टाग्रामवर ३४ मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

अमिताभ बच्चनदेखील सलमानप्रमाणे एखा पोस्टसाठी ५० लाख रुपये मानधन घेतात.