शरद केळकरने हिंदी अभिनेत्रीशी केलंय लग्न, अभिनेत्याच्या पत्नीने मालिकांमध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:55 IST2025-01-22T15:52:04+5:302025-01-22T15:55:51+5:30

शरदप्रमाणेच त्याची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या पत्नीचं नाव किर्ती असं आहे.

शरद केळकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने मराठी, हिंदी आणि साऊथमध्येही काम केलं आहे.

शरदप्रमाणेच त्याची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या पत्नीचं नाव किर्ती असं आहे.

किर्तीने अनेक हिंदी मालिकाविश्व गाजवलं आहे. 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे', 'ससुराल सिमर का', 'कुसुम','छोटी बहू' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांच्यात जवळीक वाढली.

त्यानंतर ३ जून २००५ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे.

मंगळवारी किर्तीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसासाठी शरदने खास पोस्ट शेअर केली होती.

किर्ती व शरद नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

'नच बलिए' या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.