Shehnaaz Gill : "त्याला हवं असेल तर...": शहनाज गिलच्या आयुष्यातला मिस्ट्री मॅन कोण, कधी करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:21 PM2024-08-01T13:21:32+5:302024-08-01T13:41:31+5:30

Shehnaaz Gill : पंजाबी इंडस्ट्रीमधून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी शहनाज गिल सध्या अमेरिकेला गेली आहे.

पंजाबी इंडस्ट्रीमधून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी शहनाज गिल सध्या अमेरिकेला गेली आहे. ती तिथे चाहत्यांना भेटते आणि कार्यक्रमांनाही हजेरी लावते.

यूट्यूब व्लॉगिंगच्या माध्यमातून ती चाहत्यांना अमेरिकेशी संबंधित काही अपडेट्स देताना दिसत आहे. नुकतंच शहनाजने हेही सांगितलं की ती नेमकी कधी लग्न करणार आहे.

एका फॅनशी संवाद साधताना शहनाज तिच्या मिस्ट्री मॅन आणि लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली - मला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे, पण जर मुलाला हवं असेल तर आम्ही धूमधडाक्यात देखील लग्न करू शकतो.

"लग्न साधं पद्धतीने होवो किंवा स्वप्नवत होवो, काहीही असो, एका पॉईंटवर लग्न व्हायलाच हवं. पण लग्नाला अजून बराच वेळ आहे. लग्नाबद्दल बोललं नाही तर चांगलं."

"जर मला एखादा मुलगा सापडला आणि तो लग्नासाठी तयार असेल तर मी त्याला विचारेन की, त्याला कोणत्या पद्धतीने आणि कसं लग्न करायचं आहे."

"जर एखादा मुलगा साधा असेल तर आम्ही साध्या पद्धतीने करू. जर त्याला धुमधाम पद्धतीने करायचं असेल तर आम्ही त्याच्या इच्छेनुसार तसं करू. मला काहीच अडचण नाही" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

आजही शहनाज गिल तिचा मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्या आठवणीत भावूक होते. शहनाजने ती नेमकं कधी लग्न करणार आहे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

शहनाज नेमक्या कोणत्या मिस्ट्री मॅनला डेट करत आहे हे देखील तिने सांगितलं नाही. रिपोर्टनुसार शहनाजचं नाव अभिनेता राघव जुयालसोबत जोडलं जात आहे.

शहनाज सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर घायाळ होतात.