शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- "समांथा हिरा आहे आणि ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:59 AM2024-08-10T11:59:57+5:302024-08-10T12:03:31+5:30

नागा चैतन्य आणि शोबिताच्या साखरपुड्यातील रोमँटिक फोटो समोर, नेटकरी म्हणाले- "समांथासारखा हिरा सोडून..."

नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी गुरूवारी(८ ऑगस्ट) साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनी साखरपुड्यासाठी पारंपरिक साज केला होता.

शोभिताने नुकतेच साखरपुड्यातील काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. पण. हे फोटो पाहून समांथाच्या चाहत्यांनी अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.

नागा चैतन्य आणि शोभिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी नागा चैतन्याला ट्रोल केलं आहे.

"सोन्याच्या शोधात त्याने हिरा गमावला", "समांथा हिरा होती", "तू हिरा गमावला आहेस", "समांथा तुमच्या दोघांपेक्षा खूप यशस्वी आहे", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काहीच वर्षांत २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.

समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.