साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:04 PM2022-08-24T15:04:48+5:302022-08-24T15:07:43+5:30

Madhurani gokhale: मधुराणीने मालिकेच्या सेटवर फोटोशूट केलं असून त्यातील निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.

या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.

मधुराणी कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच मधुराणीने आई कुठे काय करतेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.

मधुराणीने मालिकेच्या सेटवर फोटोशूट केलं असून त्यातील निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मधुराणीने हिरव्या रंगाच्या साडीत हे खास फोटोशूट केलं आहे.

तिच्या स्वभावातील साधेपणा कायमच प्रेक्षकांना आपलंसं करत असतो.