Sonakshi Sinha in a stunning gold embroidered red lehenga took 1,000 hours to embroider see photos
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लाल लेहेंग्यातील रॉयल लूक; पाहा फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:42 PM2024-04-15T17:42:41+5:302024-04-15T17:49:30+5:30Join usJoin usNext अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सोनाक्षीनं वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउजमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. सोनाक्षीच्या या लेहेंग्याची खासियत म्हणजे यावरील भरतकाम करण्यासाठी 1000 तास लागले आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या लाल लेहेंग्याला आधुनिक टच देण्यासाठी पारंपारिक साडी आणि नक्षी सामग्रीसह लेदरचा समावेश करण्यात आला आहे. सुंदर अशा लेहेंग्यावर सोनाक्षीनं त्याला साजेशे असे झुमके परिधान केले आहेत. यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसतोय. सोनाक्षीने तिचे बॅक टू बॅक फोटो शेअर करत केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. सोनाक्षीचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सोनाक्षीच्या या फोटोंना अल्पावधीतच खूप पसंती मिळाली आहे. सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.टॅग्स :सोनाक्षी सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूडSonakshi SinhaCelebritybollywood