स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लडाखला गेली सोनाली कुलकर्णी, कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 02:49 PM2024-08-15T14:49:28+5:302024-08-15T14:55:57+5:30

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लेह लडाखमध्ये आहे. नुकतेच तिने फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लेह लडाखमध्ये आहे. नुकतेच तिने फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णी हिने आज स्वातंत्र्य दिन कारगिर वॉर मेमोरियल येथे साजरा केला. तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.

इतकेच नाही तर सोनालीने लडाखच्या रस्त्यावर बुलेट बाइक चालवून देशाचा झेंडा फडकावला आहे.

सोनाली कुलकर्णी लडाखमध्ये तिच्या आईसोबत गेली आहे.

तिने कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत लिहिले की, आज मला कारगिल वॉर मेमोरियल येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले…

अमर ज्योती यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर #टोललिंग टेकडी ओलांडून ९ किमी अंतरावर, आमचा आवाज एलओसीवर उपस्थित असलेल्या आमच्या सैनिकांपर्यंत पोहोचू द्या, असेही तिने लिहिले आहे.

"भारत माता की जय" च्या घोषणा देताना अंगावर काटा उभा राहत असल्याचेही तिने सांगितले आहे.

तिने पुढे म्हटले की, आणि टायगर हिल,रिने हिल, बत्रा हिल, द्रास, कारगिलवर, 1999 नंतर पुन्हा आपल्या देशाचा तिरंगा फडकवला गेला आहे, तो असाच उंच लहरत राहो.

जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत तिने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.