बैलगाडी, ढोल ताश्यांचा गजर अन् बरंच काही; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा ग्रँड लॉंच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:23 PM2024-05-28T12:23:53+5:302024-05-28T12:49:08+5:30

काल येड लागलं प्रेमाचं मालिकेचा दादरच्या चित्रा टॉकीज मध्ये शानदार लॉंच झाला.

घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरु झालीय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं

दादर येथील चित्रा थिएटरमध्ये नुकताच या मालिकेचा दमदार प्रीमियर सोहळा पार पडला.

याप्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. ढोल-ताश्यांच्या गजरात कलाकारांचं आगमन झालं आणि मालिकेची पहिली झलक चित्रा थिएटरमध्ये संपूर्ण टीमने एकत्र पाहिली.

विशाल निकम, जय दुधाणे आणि पूजा बिरारी या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत

याशिवाय मालिकेत नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, उमेश नाईक, अभय राणे अशी दिग्गज कलाकार मंडळी आहेत

शैलेश शिर्सेकर दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत असून सोल प्रोडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.

अशाप्रकारे २७ मे पासून येड लागलं प्रेमाचं मालिका स्टार प्रवाहवर रात्री १० वाजता बघायला मिळेल