ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:03 PM2024-08-09T15:03:09+5:302024-08-09T15:24:08+5:30

'स्त्री 2' या आगामी सिनेमामुळे चर्चेत असलेली श्रद्धा कपूरच्या बालपणीचे हटके फोटो बघा (stree2, shraddha kapoor)

नाक मुरडणारी अन् डोळे मिचकवणारी ही छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

या अभिनेत्रीची मावशी बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आहे. आता तुम्ही या छोट्या मुलीला नक्कीच ओळखलं असेल. नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो

ही छोटी मुलगी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचं नाव आहे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे

श्रद्धा कपूरच्या आगामी स्त्री २ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. पहिला भाग प्रचंड गाजल्याने दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याची आतुरता आहे

श्रद्धा कपूर लहानपणी खूपच क्यूट दिसायची. तिचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. श्रद्धासारखं सिद्धांतला अभिनयात यश तितकंसं मिळालं नाही

श्रद्धा कपूरच्या स्त्री २ सिनेमात वरुण धवन, क्रिती सेनन विशेष भूमिकेत झळकणार आहेत. स्त्री २ निमित्त भेडीया, मुंज्या यांचंही एक वेगळं युनिव्हर्स तयार होतंय