एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...! तापसी पन्नूचा शिफॉन साडीत 'हसीन दिलरुबा' लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:37 PM2024-07-12T12:37:55+5:302024-07-12T12:53:35+5:30

तापसी पन्नूचं साडीतलं सौंदर्य

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा 'हसीन दिलरुबा' बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. ११ जानेवारीपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

सध्या तापसी तिच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियावर आग लावत आहे, कधी लाल, कधी पिवळ्या तर कधी निळ्या भडक साडीत ती सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.

तापसीचा 'हसीन दिलरुबा' लूक सध्या चर्चेत आहे. नुकतेच तिने निळ्या साडीतील फोटो शेअर केलेत. शिफॉन साडीत तिने दाखवलेल्या अदा काही औरच आहेत.

नयनरम्य बॅकग्राऊंड आणि तापसीचं सौंदर्य हे दृश्य मोहून टाकणारं आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळच केलं आहे.

तापसीच्या सौंदर्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे कुरळे केस. या केसात तिने गुलाबाचं फूल माळलं आहे आणि आपला लूक पूर्ण केला आहे. तसंच हातात लाल रंगाच्याच बांगड्या घातल्या आहेत.

एक नीला आसमान का, एक दर्या का और एक...असं कॅप्शन देत तिने निळ्या रंगाचं हार्ट इमोजी शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये तिने खरोखरंच आपल्या सौंदर्यातून निळा रंग उधळला आहे.

याआधीही तापसीने लाल आणि पिवळ्या साडीतील काही फोटो शेअर केले होते. हे सगळं फोटोशूट तिने उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये केलं आहे.