विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली, 10 वर्ष अफेअर; नातं तुटल्यानंतर आजही एकटीच जगते आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:14 PM2024-08-06T12:14:36+5:302024-08-06T12:29:40+5:30

आज अभिनेत्री ५२ वर्षांची असून एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत आहे

मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात कमालीचं यश मिळालं. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्या एकट्याच राहिल्या.

अफेअर, ब्रेकअप, विवाहबाह्य संबंध हे तर अगदी सामान्य झालं आहे. बॉलिवूडमध्ये तर अशा अनेक चर्चा कानावर पडत असतात. त्यातच एक अभिनेत्री आहे जी वयाच्या ५२ व्या वर्षीही एकापेक्षा एक भूमिका करत पण वैयक्तिक आयुष्यात ती एकटीच आहे.

ही आहे अभिनेत्री तब्बू (Tabu). तब्बूचं खरं नाव तबस्सूम फातिमा हाश्मी आहे. गेल्या ४२ वर्षांपासून ती इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. तब्बूचा जन्म 1971 साली हैदराबादमध्ये झाला. तिच्या वडिलांचं नाव जमाल हाश्मी तर आईचं नाव रिजवाना आहे.

तब्बूचं बालपण काही सोपं नव्हतं. तिच्या जन्मानंतर तिचे आईवडिल वेगळे झाले. तेव्हा तब्बूची आई शाळेत शिकवायची. तब्बूने हैदराबादमध्येच शिक्षण पूर्ण केलं. 1983 साली ती मुंबईत आली. दोन वर्ष ती सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये होतीय.

वयाच्या केवळ 11 व्या वर्षी तब्बूने सिनेमात करिअरला सुरुवात केली. 'हम नौजवान' या देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली. तेव्हा देवानंद यांनीच तबस्सूमला तब्बू हे नाव दिलं. यानंतर तिने काही साऊथ सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या.

1994 साली तब्बूने 'पहला पहला प्यार' या हिंदी सिनेमात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. मात्र यातून तिला फारशी ओळख मिळाली नाही. नंतर तिने अजय देवगणसोबत 'विजयपथ' मध्ये काम केलं. यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. 'माचिस' सिनेमातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

फिल्मी करिअर जोरात सुरु असतानाच तब्बूला वैयक्तिक आयुष्यात मात्र खरं प्रेम मिळालंच नाही. तब्बू साऊथचा सुपरस्टार नागार्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. १० वर्ष त्यांचं अफेअर चाललं. तेव्हा नागार्जुन विवाहित होता. तब्बूसाठी तो पत्नीला घटस्फोट देण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्यांचं नातं तुटलं.

तब्बू आणि अजय देवगणचंही अफेअर असल्याची नंतर चर्चा झाली. मात्र ते दोघं खूप चांगले मित्र असल्याचं समोर आलं. आजही या जोडीचे चित्रपट हिट होतात.

तब्बू आज ५२ वर्षांची आहे तरी तिचं सौंदर्य आणि फीटनेस आहे तसंच आहे. दृश्यमसारख्या सिनेमात तिने साकारलेली IG पोलिस अधिकारीची भूमिका पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले होते.