tamannaah bhatia net worth first indian actress part of rs 1000 crore film
बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:24 AM2024-08-29T11:24:13+5:302024-08-29T11:41:00+5:30Join usJoin usNext अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत खूप एक्टिव्ह आहे. आज ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. तमन्नाने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिलेला नसला तरी ती साऊथमधील अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे. तमन्नाने श्रीमधून तेलुगु इंडस्ट्रीत आणि केडीतून तामिळ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. वियाबारी या चित्रपटातून ती फेमस झाली. बाहुबली आणि बाहुबली २ या बिग बजेट चित्रपटांमध्ये तमन्ना मुख्य भूमिकेत दिसली होती. तिने अवंतिकाची भूमिका साकारली होती. बाहुबली २ हा १००० कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. अभिनेत्रीच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचं झाले तर ते काही खास राहिलं नाही. अभिनेत्रीची तिच्या कामासाठी खूप प्रशंसा केली गेली, परंतु बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडले. तमन्ना हमशकल्स, हिम्मतवाला आणि एंटरटेनमेंट सारख्या चित्रपटात दिसली. तिने अद्याप बॉलिवूडला एकही हिट चित्रपट दिलेला नाही. सध्या अभिनेत्रीच्या एका आयटम नंबरची खूप चर्चा आहे. तमन्नाने स्त्री २ चित्रपटातील 'आज की रात' हे गाणे केले आहे, जे चार्टबीटवर अव्वल आहे. याशिवाय तमन्ना लस्ट स्टोरीजमध्येही दिसली होती. या मालिकेत ती विजय वर्मासोबत दिसली होती. विजयसोबतची तिची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. पर्सनल लाईफमध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर तमन्ना गाण्यासाठी १ कोटी रुपये आणि चित्रपटांसाठी ३ कोटी रुपये फी घेते असे रिपोर्ट्स आहेत. डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये आहे.टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडTamannaah Bhatiabollywood