५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:39 PM2024-09-20T12:39:40+5:302024-09-20T12:53:11+5:30

अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने प्रभास, शाहरुख खानसह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.

ही अभिनेत्री साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केलं आहे आणि ती खूप आलिशान जीवन जगते. अभिनेत्रीच्या संपत्तीची माहिती मिळताच हैराण व्हाल.

अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. तरीही, ५० सेकंदाच्या परफॉर्मन्ससाठी ५ कोटी रुपये फी घेते. ही अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने प्रभास, शाहरुख खानसह अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.

ही अभिनेत्री म्हणजे साऊथची सुपरस्टार 'नयनतारा' आहे. नयनताराने साऊथमध्ये अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत आणि तिने शाहरुख खानसोबतच्या ब्लॉकबस्टर 'जवान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

नयनताराने तमिळ चित्रपटसृष्टीत जास्त काम केलं आहे. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत तिने ७५ हून अधिक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले.

आज नयनताराचा समावेश देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट मनासिनक्करे या चित्रपटातून केली होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. यानंतर, अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि अय्या, चंद्रमुखी, गजनी आणि बरेच काही हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट केले.

नयनताराचा 'बिल्ला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटानंतर ती स्टार बनली. २०१० मध्ये, तिने बॉक्स ऑफिसवर पाच हिट चित्रपट दिलं. यासोबतच तिला लेडी सुपरस्टारचा टॅगही मिळाला.

अभिनेत्रीने २०२३ मध्ये शाहरुख खानसोबत 'जवान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ६४०.२५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं. या चित्रपटाने जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने टाटा स्कायसाठी ५० सेकंदांची जाहिरात करण्यासाठी ५ कोटी रुपये इतकी मोठी फी वसूल केली आहे. ही जाहिरात तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह ४ भाषांमध्ये २ दिवसांत शूट करण्यात आली.

नयनतारा अतिशय आलिशान जीवन जगते. ती एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते. नयनताराची एकूण संपत्ती २०० कोटी रुपये आहे.

अभिनेत्रीकडे ५० कोटी रुपयांचं प्रायव्हेट जेट असल्याचंही सांगण्यात येत आहे. नयनताराचा विवाह विघ्नेश सिवनशी झाला आहे. या दोघांना दोन गोड मुलं आहेत.