'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचं बेबी शॉवर, साडीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:55 IST2025-01-23T16:52:50+5:302025-01-23T16:55:48+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोनिकाने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोनिकाने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
मालिकेच्या सेटवर कलाकारांनी मोठ्या थाटामाटात मोनिकाचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला होता.
आता अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिचं बेबी शॉवर केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
बेबी शॉवरसाठी मोनिकाने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. अगदी साधा मेकअप तिने केला होता.
तर तिच्या पतीने लुंगी नेसली होती. कुटुंबीयांसोबत मोनिकाने बेबी शॉवर केलं.
साडीत मोनिकाने बेबी बंपही फ्लॉन्ट केला. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लोदेखील दिसत होता.
'ठरलं तर मग' मालिकेत मोनिका अस्मिता हे पात्र साकारत होती. आता तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे.