'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीची परदेस वारी, मॉर्डन लूकमध्ये दिसली अर्जुनची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:23 PM2024-11-27T17:23:02+5:302024-11-27T17:28:35+5:30

प्राजक्ता सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्या पतीसह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता दिघे अर्जुनच्या आईची म्हणजे कल्पना ही भूमिका साकारत आहेत.

प्राजक्ता सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्या पतीसह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

प्राजक्ता व्हिएतनामला गेल्या आहेत. परदेशवारीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये त्यांचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिएतनामच्या रस्त्यांवर उभं राहून त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.

पडद्यावर साडीमध्ये दिसणाऱ्या प्राजक्ता यांचा मॉडर्न लूक फोटोत पाहायला मिळत आहे.

जीन्स, टॉप, शूज आणि डोळ्यांवर गॉगल असा लूक त्यांनी केला आहे. त्यांचा हा मॉडर्न अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

प्राजक्ता या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे.