'फॅमिली मॅन'च्या या अभिनेत्रीनं ऑनस्क्रीन Kiss आणि इंटिमेट सीनला दिला नकार, म्हणाली - 'नवऱ्याला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 05:44 PM2023-07-01T17:44:31+5:302023-07-01T17:48:49+5:30

ही अभिनेत्री लवकरच शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटात झळकणार आहे.

'द फॅमिली मॅन'मध्ये झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी सध्या तिच्या 'मैदान' आणि 'जवान' या दोन हिंदी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. प्रियमाणी दोन दशकांपासून सिनेमाचा एक भाग आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत, मात्र प्रियमणी ऑनस्क्रीन किसिंग किंवा इंटिमेट सीनपासून दूर राहते.

खरं तर तिने तिच्या करारात 'नो किसिंग' क्लॉज जोडला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणीने रुपेरी पडद्यावर चुंबन किंवा इंटिमेट सीन न करण्याचे कारण सांगितले.

प्रियामणीने सांगितले की, ती यात कम्फर्टेबल नाही आणि ती कधीही ऑनस्क्रीन किस करणार नाही. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या पतीला उत्तर द्यावे लागेल.

चित्रपटाच्या पडद्यावर चुंबन घेणे किंवा न घेणे ही तिची वैयक्तिक निवड असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या प्रियामणीने म्हटले आहे. या सर्व गोष्टी अभिनेत्रीने 'न्यूज18'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या. प्रियामणी म्हणाली की ती चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त चुंबन फक्त गालावरच करु शकते.

तिच्या 'नो किसिंग' पॉलिसीबाबत प्रियामणी म्हणाली, 'मी ऑनस्क्रीन किस करणार नाही. माझ्या बाजूने यासाठी नाही आहे.

मला माहित आहे की ही फक्त एक भूमिका आणि माझे काम आहे, परंतु वैयक्तिकरित्या सांगायचे तर, मला ऑनस्क्रीन दुसर्‍या पुरुषाचे चुंबन घ्यावे लागले तर मला सोयीस्कर होणार नाही. याचे कारण मला माझ्या पतीला उत्तर द्यावे लागेल, असे ती म्हणाली.

प्रियामणीचे लग्न मुस्तफा राजसोबत झाले आहे. 23 ऑगस्ट 2017 रोजी एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. प्रियामणीने सांगितले की, हिज स्टोरी या शोमध्ये प्रियामणीला अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत एक इंटिमेट सीन करायचा होता. पण अभिनेत्री यात कम्फर्टेबल नव्हती. गालावर चुंबन घेण्यापेक्षा मला इतर गोष्टी जमणार नाही. असे अनेक प्रोजेक्ट्स माझ्याकडे आले, ज्यात अशी दृश्ये होती आणि मी त्यात कम्फर्टेबल नसल्याचे त्यांना सांगितले.

प्रियामणी पुढे म्हणाली, 'मला माहित आहे की जेव्हाही तो प्रोजेक्ट बाहेर येईल तेव्हा दोन्ही बाजूचे माझे कुटुंब ते पाहतील. त्यांना हे देखील माहित आहे की हे माझे काम आहे, परंतु मला अनकंफर्टेबल करायचे नाही. त्या लोकांना वाटेल की लग्न होऊनही आमची सून हे सगळं का करत आहे? ते लोक काही बोलणार नाहीत, पण ही माझी वैयक्तिक निवड आहे.

प्रियामणीने 2003 च्या तेलुगु चित्रपट एवारे अटागाडू मधून तिच्या अभिनयाची सुरुवात केली, परंतु 2007 च्या परुथिवीरन चित्रपटातून ती स्टारडमवर पोहोचली. साऊथशिवाय प्रियामणीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे.

ती 'रावण', 'रक्तचरित्र 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'आतेत' आणि 'सलाम वेंकी'मध्ये दिसली आहे. आता प्रियमणी लवकरच अजय देवगणच्या 'मैदान' आणि शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये दिसणार आहे.