'स्वातंत्र्यदिना'निमित्त हे खास सिनेमे पाहून तुमच्याही मनात जागृत होईल देशभक्तीची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:35 PM2024-08-14T17:35:41+5:302024-08-14T18:16:16+5:30

१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनानिमित्त हे लोकप्रिय सिनेमे तुम्हाला ओटीटीवर पाहता येतील

हृतिक रोशनचा 'फायटर' हा २०२४ चा बहुचर्चित सिनेमा. 'फायटर'मध्ये पहिल्यांदाच हवाई लढत आणि एअर फोर्स पायलटचं आयुष्य दिसून येतं. हृतिक रोशन - अनिल कपूर - दीपिका पादुकोण हे प्रमुख भूमिकेत होते

आमिर खानचा रंग दे बसंती हा देशभक्ती जागवणारा आणखी एक सिनेमा. सहा मित्र भ्रष्ट व्यवस्थेशी कसा लढा देतात याची गोष्ट रंग दे बसंतीमधून पाहायला मिळाली

हॉलिडे सिनेमात अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत होते. 'जवानाला त्याच्या कर्तव्यापासून कधीच सुट्टी नसते' ही या सिनेमाची टॅगलाईन होती

आलिया भटचा राझी सिनेमा खूप गाजला. एक भारतीय मुलगी स्वतःची ओळख लपवत पाकिस्तानमध्ये गुप्तहेरी कशी करते याची कहाणी पाहायला मिळते

भारताने पाकिस्तानवर जी सर्जिकल स्ट्राईक केली त्याची कहाणी 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमात बघायला मिळते

देशभक्तीपर सिनेमे म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर नाव येतं सनी देओलच्या बॉर्डर सिनेमाचं. सीमेवर लढणाऱ्या जवानांची हृदयस्पर्शी कहाणी या सिनेमा बघायला मिळाली

हृतिक रोशनचा लक्ष्य सिनेमात आजच्या पिढीची कहाणी बघायला मिळाली. आयुष्यात काय करायचंय याचं उत्तर माहित नसणारा एक तरुण सैन्यात भरती होऊन पुढे कशी अफाट कामगिरी करतो याची कहाणी लक्ष्यमध्ये बघायला मिळाली