'राजा हिंदुस्तानी'तील या अभिनेत्रीचा २८ वर्षांनंतर आता दिसते अशी, शाहरूख खानसोबतचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:14 PM2024-07-12T14:14:32+5:302024-07-12T14:23:23+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने आमिर खान, शाहरूख खान आणि अक्षय कुमारसोबत काम केलंय. बऱ्याच कालावधीपासून ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावरून गायब आहे.

१९९३ साली टेलिव्हिजनवरील तारा मालिका आठवत असेल ना. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री नवनीत निशान झळकली होती.

तिने एका लूकचा ट्रेंड आणला होता. त्यावेळी बॉब कट केसांसोबत साडी आणि हेवी ज्वेलरीचा असा युनिक लूक केला होता. तारा व्यतिरिक्त निशानने सिनेमातही काम केलंय.

१९९६ साली रिलीज झालेला राजा हिंदुस्तानी चित्रपटातून वेगळी ओळख मिळाली.

आता ही अभिनेत्री खूपच वेगळी दिसते. दरम्यान आता तिचा शाहरूख खानसोबतचा जुना फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. हा फोटो लम्हे जुदाई केमधला आहे.

नवनीत निशानने टेलिव्हिजनसोबत सिनेमातही काम केलंय. कधी कॅरेक्टर रोल केले तर कधी निगेटिव्ह भूमिका.

नवनीत निशानने आमिर खानसोबत राजा हिंदुस्तानी आणि हम हैं राही प्यार रेमध्ये काम केले आहे. माय नेम इज खानमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसली होती. २०१९ मध्ये तिने कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला नावाच्या वेब सीरिजमध्ये काम केले होते, तेव्हापासून ती पडद्यापासून दूर आहे.

नवनीत निशान स्क्रीन पासून दुरावली असली तरी इंडस्ट्री आणि मुंबईपासून दूर राहू शकत नाही. नवनीतचा ज्वेलरी आणि ड्रेस डिझायनिंगचा बिझनेस आहे. मुंबईत तिचे बरेचसे बुटीक आहेत. तसेच ती कलाकारांसाठी डिझायनरचे काम करते.