'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील गायत्री प्रभूचा लूक 'या' अभिनेत्रीने केलाय डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:18 PM2024-08-06T16:18:57+5:302024-08-06T17:17:44+5:30

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतल्या गायत्री प्रभूचा लूक एका मराठी अभिनेत्रीने डिझाईन केलाय (thoda tuza ani thoda maza)

स्टार प्रवाहवर प्रसारीत होत असणारी थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची मालिका.

थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गायत्रीची भूमिका साकारलीय मानसी कुलकर्णी या अभिनेत्रीने

गायत्री प्रभू अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये गायत्री मॅनेजरचं काम सांभाळतेय

गायत्री वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय.

अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे.

गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादामुळे मानसी कुलकर्णी आनंदात आहे