करिअरमध्ये 'ही' अभिनेत्री स्वत:ठरली कमनशिबी; आता ज्योतिषशास्त्र शिकून सांगतीये लोकांचं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:07 AM2023-09-11T09:07:31+5:302023-09-11T09:16:13+5:30

Bollywood actress: 'मेरे यार की शादी हैं' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

'मेरे यार की शादी हैं' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ट्युलिप जोशी. सुरुवातीच्या काळात ट्युलिपने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, हळूहळू तिचा सिनेसृष्टीतील प्रवास कमी झाला.

ट्युलिप आज कलाविश्वापासून चांगलीच लांब आहे. नुकताच तिने तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे तिच्याविषय़ी काही खास गोष्टी जाणून घेऊ.

ट्युलिपने हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही काम केलं आहे.

ट्यलिपने अनेक मोठ्या बॅनरखाली काम केलं. मात्र, तिचे बहुतांश सिनेमा फ्लॉप झाले.

गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ट्युलिपने २००० साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.

बॉलिवूडमध्ये सपशेल अपयशी ठरल्यानंतर ट्युलिपने भारतीय सैन्यात कमिशनर्ड ऑफिसर म्हणून काम केलेल्या कॅप्टन विनोद नायर यांच्याशी लग्न केलं.

ट्यलिप आणि विनोद यांची किमाया नावाची कंपनी असून या कंपनीची ७०० कोटी रुपयांची उलाढाल आहे.

अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लोकांना वैदिक सल्ला घेण्याची विनंती केली होती.

''मी ट्यूलिप जोशी एक अभिनेत्री आणि वैदिक ज्योतिषी आहे. ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मी लोकांना त्यांचे नातेसंबंध, करिअर, आरोग्य अशा अनेक समस्यांवर सल्ला देते.'' असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.