अभिनेत्यासोबत मोडला साखरपुडा, आता लग्नाआधीच अभिनेत्रीला व्हायचंय 'आई'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:26 PM2024-06-08T16:26:27+5:302024-06-08T16:31:24+5:30

ही अभिनेत्री सध्या माता पार्वतीची भूमिका साकारत आहे.

सिनेसृष्टीत एकीकडे लग्नाचे वारे वाहत असताना काही कपल्सचं ब्रेकअपही झालं आहे. कोणी घटस्फोटच घेतला तर कोणी साखरपुडाच मोडला.

काही दिवसांपूर्वीच 'शिव शक्ती- तप त्याग तांडव' मध्ये पार्वतीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सुभा राजपूतने (Subha Rajput) अभिनेता विभव रायसोबत (Vibhav Roy) साखरपुडा मोडला.

5 डिसेंबर 2022 रोजीच ते एंगेज झाले होते. मात्र आता दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला.

आता अभिनेत्री सुभाने लग्नाआधीच बेबी प्लॅनिंगविषयी भाष्य केले आहे. 'पिंकव्हिला'शी बातचीत करताना तिने लग्न आणि मुलांबाबतीत केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

सुभा म्हणाली,"मला मूल हवं आहे आणि लवकरच मी यासाठी प्लॅनिंग करेन. मी आयुष्यात खूप सहन केलं आहे. अशात आता मी सर्व गोष्टी विचारपूर्वक हँडल करते."

ती पुढे म्हणाली,"आता मी आयुष्यात माझा दृष्टिकोन बदलला आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही माझ्यासाठी चांगले सिद्ध झाले यासाठी मी खूप खूश आहे."

वयाच्या ३० व्या वर्षी सुभाने 'शिव शक्ती:तप त्याग तांडव' मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारली. आता तिने खऱ्या आयुष्यात लग्नाआधीच मूल हवं असल्याची इच्छा जाहीर केली आहे.

सध्या सुभा 'शिव शक्ती' मालिकेत देवी शक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये सलग टॉप 5 मध्ये आहे.