रेश्मा शिंदेच्या लग्नाचे Unseen फोटो आले समोर, मराठी कलाकारांनी केली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 05:51 PM2024-12-01T17:51:39+5:302024-12-01T18:16:45+5:30

अभिनेत्री रेश्मा शिंदेने काहीच दिवसांपूर्वी लग्न केलं असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (reshma shinde wedding)

अभिनेत्री रेश्मा शिंदेने काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच २९ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली. पवन असं रेश्माच्या नवऱ्याचं नाव आहे

मराठी अभिनेत्री विधिशा म्हसकरने रेश्मा शिंदेच्या लग्नात स्वतःचं खास फोटोशूट केलं. शिवाय रेश्माच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले

रेश्मा शिंदेच्या लग्नात मराठी कलाकार एकत्र आले होते. या फोटोमध्ये पाहता येईल की मराठी कलाकारांनी या लग्नात किती धमाल केली

अभिनेत्री विधिशा म्हसकरने रेश्मा आणि तिच्या नवऱ्यासोबत खास सेल्फी घेतला. हा फोटो सर्वांना पसंत पडला

विधिशाने या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. विधिशा खूपच सुंदर दिसत होती

या लग्नात अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अभिनेत्री पूर्णिमा तळवलकरही सहभागी झाले होते.

विधिशा आणि हर्षदा यांनी रंग माझा वेगळा मालिकेत एकत्र काम केले होते. रेश्माच्या लग्नसोहळ्यानिमित्त दोघींची पुन्हा भेट झाली