Versace Baby गाण्यातून धुमाकूळ घालणाऱ्या उर्वशी रौतेलाने शेअर केले बाथरोबमध्ये फोटो, पाहा तिचे हटके Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:31 PM2021-05-21T12:31:26+5:302021-05-21T12:37:43+5:30

उर्वशी रौतेलाच्या आंतराष्ट्रीय 'वर्सेस बेबी' या अल्बमला तुफान लोकप्रियता मिळत आहे.रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे उर्वशी सध्या चर्चेत आहे.उर्वशी यामध्ये इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदानसोबत झळकली आहे.

'वर्सेस बेबी' गाण्यामधील उर्वशीचा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. तिच्या या लुकवरही प्रचंड चर्चा होत आहे.

या अल्बमसाठी तिने १५ कोटी रुपयांचा ड्रेस परिधान करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.

अल्बमसाठी उर्वशीच्या या महागडे आउटफिट डिझाईन करण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागला असल्याचेही बोलले गेले.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनसेन्समुळे चर्चेत असते.

बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलेल्या उर्वशी रौतेलाने बाथरोबमधले फोटो शेअर केले आहेत.

उर्वशीच्या या बाथरोब फोटोनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उर्वशीने बाथरोब घालून स्टनिंग पोज दिल्या आहेत.

उर्वशीच्या या फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा हटता हटत नाहीत.

तिच्या चाहत्यांनी फोटो शेअर होताच खूप कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

उर्वशी लवकरच तमिळमध्ये आपला डेब्यू करणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. यासाठी तिला १० कोटींचे मानधन मिळाले आहे.