कोण आहेत नंदिता महतानी? विद्युत जामवाल बांधणार तिच्याशी लग्नगाठ, करिश्मा कपूरच्या एक्स-पतीशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:30 PM2023-10-05T15:30:34+5:302023-10-05T15:42:52+5:30

विद्युतची होणारी पत्नी नंदिता महतानी आहे तरी कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल अनेकदा त्याच्या चित्रपट किंवा अ‍ॅक्शन सीक्वेन्समुळे मीडियाच्या चर्चेत असतो. मात्र यावेळी तो त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. लंडनमध्ये विद्युत सातफेरे घेणार आहे.

विद्युत आणि नंदिताने २०१२मध्ये साखरपुडा उरकून घेतला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची बातमी अचानक समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांना आश्चार्याचा धक्का बसला आहे.

चाहत्यांना विद्युतच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. विद्युतच्या होणाऱ्या पत्नीचं नाव नंदिता महतानी आहे.

जाणून घेऊया विद्युतची होणारी पत्नी नंदिता महतानी आहे तरी कोण?, तिचं करिश्मा कपूरच्या एक्स पतीशी काय कनेक्शन आहे…?

नंदिता महतानी एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे.

रिपोर्ट्सनुसार ती अभिनेता दिनो मौर्यासोबत प्लेग्राउंड नावाची कंपनी देखील चालवते. इतकंच नाही तर ती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची डिझायनर आणि स्टायलिस्ट असल्याचंही बातमीत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, नंदिता ही करिश्मा कपूरचा एक्स- हसबण्ड संजय कपूरची पहिली पत्नी आहे. त्यांचं नातं फार काळ टिकले नाही. नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्माशी लग्न केले. 2016 मध्ये करिश्मा आणि संजयचादेखील घटस्फोट झाला.

संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर नंदिता काळी काळ अभिनेता डिनो मोरियासोबतही रिलेशनशिपमध्ये होती. मात्र कालांतराने त्याचं ब्रेकअप झालं.

नंदिता महतानी आणि विद्युत जामवाल यांच्या डेटींगच्या बातम्या जानेवारी 2021 पासून येऊ लागल्या होत्या. अभिनेत्याने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याने 'जीत लिया' असे लिहिले होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. यानंतर विद्युत आणि नंदिताने त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीने चाहत्यांना धक्का दिला.