डॉक्टर म्हणाले 'तू आई होणार नाही'; तिच अभिनेत्री आहे चौथ्यांदा प्रेग्नंट? By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 07:16 PM 2022-07-28T19:16:37+5:30 2022-07-28T19:20:33+5:30
Neeru bajwa: एकेकाळी नीरू कधीच आई होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, त्याच नीरुने तीन मुलींना जन्म दिला. त्यानंतर आता ती चौथ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्यात एक ट्विस्ट आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
पंजाबी सिनेइंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नीरु बाजवा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही गुडन्यूज शेअर केली.
एकेकाळी नीरू कधीच आई होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, त्याच नीरुने तीन मुलींना जन्म दिला. त्यानंतर आता ती चौथ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्यात एक ट्विस्ट आहे.
विशेष म्हणजे नीरुला यापूर्वी तीन मुली असल्यामुळे ती पुन्हा प्रेग्नंट असल्याचं कळताच सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.
तीन मुलींची आई असलेली नीरु खरोखर प्रेग्नंट नसून तिच्या आगामी चित्रपटात ती गरोदर महिलेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर तिने शेअर केल्यामुळे तिच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली.
नीरु सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या लेकींसोबतचे फोटो कायम शेअर करत असते.
नीरु लवकरच ब्युटीफूल बिल्लो या चित्रपटात झळकणार असून तिचा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
हे पोस्टर शेअर करत बिल्लो माँ बनने वाली है 11 अगस्त को बिल्लो को बधाइयां देने ZEE5 पर आ जाइए, असं कॅप्शन देत तिने बेबीबंप दिसत असलेलं पोस्टर शेअर केलं आहे.
तीन मुलींची आई असलेली नीरु ४१ वर्षांची असून प्रचंड फिट असल्याचं पाहायला मिळतं.
नीरु, लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि दिग्दर्शिकादेखील आहे.
मूळची कॅनडाची असलेली नीरु बाजवा पंजाबी कलाविश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. 'मॅम सोलह बरस' की या चित्रपटातून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली.