शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याचा खरा मालक कोण?, पाहा २०० कोटींच्या घराचे Inside Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:35 PM2023-09-06T17:35:02+5:302023-09-06T17:42:39+5:30

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. शाहरुखने आपल्या मेहनतीने हिंदी चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे. यामुळेच आज अभिनेता लक्झरी लाइफ जगतो आहे. शाहरुख मुंबईतील मन्नत या २०० कोटी रुपयांच्या बंगल्यात राहतो.

ही गोष्ट २००१ सालची आहे. जेव्हा शाहरुख खानने 'बाई खोरशेद भानू संजना ट्रस्ट'कडून 'विला व्हिएन्ना' विकत घेतला. त्यावेळी शाहरुखने हा बंगला १३ कोटींहून अधिक रुपयांना खरेदी केला होता. ज्याचे नाव त्याने आधी 'जन्नत' ठेवले. पण नंतर अभिनेत्याने ते बदलून 'मन्नत' केले.

फार कमी लोकांना माहित असेल की शाहरुख खानच्या आधी केकू गांधी मन्नतचे मालक होते. तेव्हा हा बंगला 'केकी मंझिल' म्हणून ओळखला जायचा. जिथे गांधीजींचे आई-वडील राहत होते.

पिढ्यानपिढ्या टिकून राहिलेला हा बंगला अखेर नरिमन दुबाश यांना वारसा मिळाला. त्यांच्याकडूनच शाहरुख खानने तो विकत घेतला, कारण अभिनेत्याला हा बंगला आवडला होता. कारण ते समुद्राच्या किनाऱ्यावर बांधला आहे.

शाहरुख खानच्या या बंगल्यात विटेंज, मॉर्डन आणि स्टायलिश इंटेरियरचा मिलाप पाहायला मिळतो. या बंगल्यात बेडरुम व्यतिरिक्त बॉक्सिंग रिंग, टेनिस कोर्ट आणि एक मोठा पूलदेखील आहे.

मन्नतमध्ये शाहरुख खानचे कार्यालयही आहे. तिथेच शाहरुख खान सगळ्या मीटिंग घेतो. तसंच बंगल्यात एक अवॉर्ड रुमही आहे. शाहरुख आपल्याला मिळालेले सर्व अवॉर्ड या रुममध्ये ठेवतो.

२०१६ मध्ये आर्किटेक्ट राजीव पारेखने मन्नतला रिनोव्हेट केले. आज मन्नतची किंमत २०० कोटी आहे. याशिवाय मन्नतच्या बाहेर डायमंड्सने सजवलेली नेमप्लेट लावण्यात आली आहे. याची किंमत २५ लाख रुपये आहे. याशिवाय शाहरुखचं दिल्ली, लंडन, दुबईतही घर आहे.