आयुर्वेदानुसार, रात्रीच्या जेवणातून 'हे' पदार्थ दूर ठेवाल तर फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 01:49 PM2019-08-07T13:49:36+5:302019-08-07T13:59:36+5:30

रात्री जास्त जेवल्याने अ‍ॅसिडीटी आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे पचनक्रियेमध्ये बिघाड होण्याचीही शक्यता वाढते. आयुर्वेदानुसार, रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला फक्त लो कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खाणं गरजेचं असतं. कारण हे पचण्यास हलके असतात. रात्रीच्या जेवणात जास्त आहार घेतल्याने अस्वस्थता आणि झोप न येण्याची शक्यता वाढते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही फिट अन् हेल्दी राहू इच्छिता, तर रात्रीच्या जेवणामध्ये हे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं...

रात्रीच्या आहारात दह्याचं सेवन करणं कटाक्षाने टाळावं. दह्याऐवजी तुम्ही ताक घेऊ शकता. दही शरीरामध्ये कफ होण्याची समस्या वाढवतो. ज्यामुळे नाक वाहण्याचीही समस्या होऊ शकते.

जर तुम्हाला रात्री दूध पिण्याची सवय असेल तर कमी फॅट असलेलं दूध प्या. परंतु, थंड दूध पिणं कटाक्षाने टाळा. नेहमी दूध उकळून प्या. गरम दूध आणि कमी फॅट असलेलं दूध पचण्यास हलकं असतं.

रात्रीच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळा. असं केल्याने शरीरामध्ये उष्णता वाढते आणि भूकही भागत नाही. तसेच जेवणामध्ये दालचिनी, बडिशोप, मेथी आणि वेलची या पदार्थांचा समावेश करा. पण रात्रीच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थ खाणं कटाक्षाने टाळा.

जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर ही एक गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की, रात्रीच्या आहार कमी घ्या आणि हळूहळू चावून खा. त्यामुळे तुम्ही हेल्दी राहाल आणि तुम्हाला झोपही चांगली येईल. रात्री आपलं पाचनतंत्र निष्क्रिय असतं, ज्यामुळे आपल्या शरीराला जड पदार्थ पचवणं शक्य नसतं. जास्त खाल्याने अपचन, गॅस आणि बद्धकोष्ट यांसारख्या समस्या उद्भवतात.

रात्रीच्या वेळी प्रोटीन असणारे पदार्थ म्हणजेच, डाळ, हिरव्या पालेभाज्य, कढिपत्ता आणि फळं इत्यादी. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच हेल्दी राहण्यासही मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.