Amazing benefits of jamun black plum or jambul and its seeds
डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी ठरतं जांभूळ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 03:17 PM2019-07-08T15:17:12+5:302019-07-08T15:23:37+5:30Join usJoin usNext जसं कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आंबा खाण्याची गंमत वेगळीच असते, अगदी तसचं पावसाळ्यामध्ये जांभूळ खाण्याची बात काही औरच... जांभूळ जवळपास सर्वच लोक खातात, परंतु याचे गुणधर्म आणि फायद्यांबाबत फारसं कोणालाच माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला जांभूळ आणि त्याच्या बियांच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. जांभळाला जगभरामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जसं की, जांभूळ, ब्लॅक प्लम, जावा प्लम किंवा मग जॅम्बलँग इत्यादी... डायबिटीजवर गुणकारी डायबिटीजच्या रूग्णांसाठी जांभळांसोबतच त्याच्या बियाही गुणकारी ठरतात. त्यामुळे डायबिटीसने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती जांभूळ खाण्याऐवजी त्याच्या बियांच्या चूर्णाचे सेवन करू शकतात. यासाठी जांभूळाच्या बिया सुकवून त्यांची पावडर करून घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये एकत्र करून त्याचे सेवन करा. रक्त शुद्द करण्यासाठी उपयोगी जांभळामध्ये मुबलक प्रमाणा आयर्न असतं, जे रक्त शुद्ध करण्यासाठी आणि रक्त वाढविण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त हे डायरिया, अपचन यांसारख्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. वाढतं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत आपल्यापैकी कदाचितच कोणाला माहीत असेल की, जांभूळ वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं. यामध्ये कॅलरीचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरतं. कॅन्सरवर फायदेशीर जांभूळ कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत करतं. 2005मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून असा दावा करण्यात आला होता की, जांभळामध्ये कॅन्सरला आळा घालणारे आणि किमोप्रिवेंटिव तत्व असतात. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी जांभूळ आपल्या हृदयासाठीही गुणकारी ठरतं. याच्या सेवनाने हृदयाशी निगडीत आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. या लोकांनी जांभळाचं सेवन करणं टाळावं ज्या लोकांना ब्लड क्लॉट, श्वासाशी निगडीत आजार किंवा हायपोग्लाइसिमिया आहे, अशा व्यक्तींनी शक्यतो जांभूल खाणं टाळावं. जांभळामध्ये क्लॉटिंग तत्व असतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी जांभळाचं सेवन करू नये. डायबिटीसच्या व्यक्तींनीही जांभळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्समधुमेहकर्करोगआरोग्यहृदयरोगHealthy Diet PlanHealth TipsdiabetescancerHealthHeart Disease