Be careful while using ginger in winter
हिवाळ्यात आल्याचं सेवन करत असाल तर सावधान.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 11:31 AM2020-01-05T11:31:20+5:302020-01-05T12:07:39+5:30Join usJoin usNext हिवाळ्यात सगळयानांच गरम खावसं वाटत असतं. त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहा. कोणताही ऋतू असेल तरी आपल्याला आल्याचा हवाच असतो. थंडीच्या वातावरणात गरम वाटण्यासाठी सारख चहा प्यावसं वाटत असतं. पण जर तुम्ही आल्याच चहा पित असाल तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतं. असं जरी असलं तरी आल्याचं जास्त सेवन केलं तर महागात सुद्दा पडू शकतं. तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. चला तर मग जाणून घेऊया आल्याचं सेवन केल्यामुळे आरोग्यासाठी कसं नुकसानकारक ठरू शकतं. आलं हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर आल्यांच जास्त सेवन केलं तर आरोग्यासाठी नुकसान ठरू शकतं. आल्याचं सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. कारण आल्यात असलेले औषधी गुणधर्म अन्न पचण्यास फायदेशीर ठरतात. पण जर आल्याचं सेवन जास्त करत असाल तर या स्थितीत पोट बिघडून जुलाब होण्याची शक्यता असते. आल्यामुळे गॅस आणि पोटदुखीची समस्या दूर होते. पण त्यासाठी याचा वापर फक्त चहातच करावा. जेवणात जास्त समावेश करू नये. कारण त्यामुळे समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जर तुम्ही भाज्या बनवताना मसाल्यात किंवा फोडणीत आल्याचा चवीसाठी जास्त वापर करत असाल तर यामुळे पदार्थाला चांगली चव येईल पण त्यामुळे एसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते. अनेकांना मसालेदार पदार्थ खाल्ल्यांमुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्याचं कारण आल्याचा केलेला अतिवापर हे असू शकतं. आल्याचा आहारात समावेश केल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. तसंच आल्याचं जास्त सेवन केल्यामुळे ही प्रकिया अधिक जलदगतीने झाल्यास आरोग्याला धोका उद्भवू शकतो. टॅग्स :अन्नआरोग्यfoodHealth