Benefits of jaggery in your tea for health in winter
हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे फायदे वाचाल, तर साखरेचा चहा विसराल By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:56 PM2020-01-19T18:56:27+5:302020-01-19T19:08:31+5:30Join usJoin usNext हिवाळ्यात आलं आणि वेलची घातलेला चहा सर्वाधिक प्यायला जातो. त्याचसोबत जर तुम्ही गुळाचा चहा प्याल तर आरोग्याला अनेक फायदे होतील. रोज गुळाचा चहा प्यायल्याने त्वचेवर येणारी पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. गुळाचा चहा प्यायल्याने आरोग्य चांगलं राहतं गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. यासोबतच गुळ हा गरम पदार्थ आहे. जो सर्दी-खोकल्यापासून आराम देतो. गुळाच्या चहाच्या सेवनाने शरीरातील टाॅक्सीन दूर होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो. गुळाचा चहा प्यायल्याने पाचनक्रिया सक्रीय होऊन बद्धकोष्ठता कमी होते. गोड पदार्थांमध्ये आरोग्यदायी ठरणाऱ्या गुळाचे शरीराला अनेक फायदे होतात. गुळाचं नियमितपणे सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा रामबाण उपाय ठरतो.टॅग्स :अन्नआरोग्यfoodHealth