Buttermilk decreases blood pressure keeps heart healthy
ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, अॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर करतं ताक! By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:19 PM2019-06-21T13:19:15+5:302019-06-21T13:33:51+5:30Join usJoin usNext ताकाला बटरमिल्क असंही म्हटलं जातं आणि वातावरणात जर उष्णता असेल, तर मग ताकापेक्षा उत्तम दुसरं काय असणार? यामध्ये असणारे हाय न्यूट्रिशंस वॅल्यू शरीराचं उष्णतेपासून रक्षण करत असून शरीर हायड्रेट ठेवण्यासाठीही मदत करतात. ताक प्यायल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते. त्यामुळे आपल्याला दररोजच्या आहारमध्ये ताकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हेच ताक आरोग्याच्या इतर समस्यांवरही गुणकारी ठरंत. जाणून घेऊया ताकाचे आरोग्यासाठी असणाऱ्या फायद्यांबाबत...हृदय हेल्दी ठेवतं ताक काही दिवसांपूर्वी झालेल्या एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, ताकामध्ये अनेक स्पेसिफिक मॉलेक्यूल्स आढळून येतात. जे हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, ताकामध्ये असणारे बायोमॉलेक्यूल्स रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि इतर हानिकारक लिपिड्स तयार होण्यापासून रोखतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, ताकामध्ये बायोटिक प्रोटिन आढळून येतं. जे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि बॅड कोलेस्ट्रॉलपासून बचाव करतं. यामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टी कॅन्सर प्रॉपर्टिज असतात. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ताकामध्ये मुबलक प्रमाणात न्यूट्रिशंस आढळून येतात. परंतु यामधील फॅट्स आणि कॅलरी फारच कमी असतात. त्यामुळे ताक कितीही प्यायलं तरी ते फायदेशीरचं ठरतं. जर तुम्ही एखाद्या दिवशी जास्त जेवला असाल तर त्या दिवशी जेवणानंतर एक ग्लास ताक प्या. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच ताक पोटातील इनर वॉल्समधूनही फॅट्स दूर करतं. उष्णतेपासून सुटका जर तुम्हाला कामासाठी सतत घराबाहेर रहावं लागतं असेल तर दररोज एक ग्लास ताक प्या. हे तुमचं शरीर हायड्रेट ठेवण्यासोबतच सन स्ट्रोकपासून दूर ठेवण्याचंही काम करतो.अॅसिडीटीपासून दूर ठेवतं ताक अॅसिडीटीची समस्या दूर करून पोट हेल्दी ठेवण्याचं काम करतो. यामध्ये जीरं, कोथिंबीर आणि इतर गोष्टी एकत्र केल्या जातात. ज्या अॅसिडीटी दूर करण्याचं काम करतात. एवढचं नाही तर उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठीही ताक मदत करतं. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत प्रोटीन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. एवढचं नाही, हाडांच्या मजबूतीसोबतच मसल्स आणि स्किनसाठीही फायदेशीर आहे. एक कप ताकामध्ये 801 प्रोटीन्स असतात. जे एक कप लो फॅट दूधासमान असतं. प्रोटीनमुळे केस स्ट्रॉन्ग आणि थिक होतात. तुम्ही घरच्या घरीही टेस्टी आणि हेल्दी ताक तयार करू शकता. जाणून घेऊया ताक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती... साहित्य : अर्धा कप दही, हिरवी मिरची, आइस क्यूब, ऑइल, लाल मिरची, चाट मसाला, कोथिंबीरीची पानं, थंड पाणी आल्याचा ज्यूस, कडिपत्ता, मस्टर्ड सीड्स, लेमन ज्यूस, मीठ चवीनुसार. तयार करण्याची कृती : ताक करण्यासाठी दही मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करा. यामध्ये थंड पाणी एकत्र करा. आता यामध्ये लेमन आणि आल्याचा ज्यूस मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये कढिपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची आणि मस्टर्ड सीड्स व्यवस्थित एकत्र करा. ते व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करून दही असणाऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करा. हे व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर यामध्ये आइस क्यूब्स, चाट मसाला आणि बारिक चिरलेली कोथिंबीर एकत्र करा. थंड थंड सर्व्ह करा ताक. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहृदयरोगHealthy Diet PlanHealth TipsHealthFitness TipsWeight Loss TipsHeart Disease