Diet to follow after the age of 50 to keep healthy and stay longer
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश; राहाल हेल्दी By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 01:12 PM2019-08-03T13:12:24+5:302019-08-03T13:17:48+5:30Join usJoin usNext वाढत्या वयानुसार, आपलं इम्युनिटी सिस्टम कमकुवत होत जाते. तसेच स्नायू कमकुवत होतात. परंतु जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. खासकरून वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर डाएटमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला काही डाएट टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वाढत्या वयात आरोग्य जपण्यासाठी फायदा होईल. आणि आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. व्होल ग्रेन (धान्य) ब्राउन राइस, गहू, बाजरी यांसारख्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतो. यांमध्ये असलेलं फायबर पचनक्रिया मजबुत ठेवण्यासाठी मदत करतो. एवढचं नाहीतर हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही व्होल ग्रेनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ मदत करतात. फॅट डाएटपासून दूर रहा फॅट डाएटपासून शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असे अनेक पदार्थ आहेत, जे लगेच वजन कमी करण्याचा किंवा शरीराला अनेक फायदे होण्याचा दावा करतात. पण हेल्दी राहायचं असेल तर फॅटयुक्त पदार्थांपासून दूर राहणं फायदेशीर ठरतं. कॅल्शिअमयुक्त पदार्थ वाढत्या वयानुसार हाडं कमकुवत होतात. ज्यामुळे ऑस्टियोपोरिसस होण्याचा धोका वाढतो. परंतु, कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने यापासून बचाव करणं शक्य असतं. यासाठी दूध आणि दह्याचं सेवन करा. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही सोया मिल्क घेऊ शकते. भरपूर पाणी प्या पाणी फक्त शरीर हायड्रेट ठेवण्यासाठीच नाहीतर अन्न पचवण्यासाठीही मदत करतं. याव्यतिरिक्त आवश्यक पोषक तत्त्व अब्जॉर्ब करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे पेशी हेल्दी राहण्यासाठी मदत होते. अवोकाडो आणि नट्स वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर डिमेशिया आणि अल्झायमर यांसारखे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक न्यूट्रिशनिस्ट असं मानतात की, वयची पन्नाशी ओलांडल्यानंतर डाएटमध्ये ऑलिव्ह ऑइल, नट्स, अवोकाडो आणि फॅटी फिश यांसारख्या पदार्थांचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :पौष्टिक आहारज्येष्ठ नागरिकफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यHealthy Diet PlanSenior CitizenFitness TipsHealth TipsHealth