Diet know why it is important to use curd for this season
...म्हणून उन्हाळ्यात दही खाणं ठरतं फायदेशीर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 06:53 PM2019-04-08T18:53:59+5:302019-04-08T18:58:57+5:30Join usJoin usNext बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्यासोबतच शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुमचा आहार त्या वातावरणानुसार संतुलित असणं आवश्यक असतं. याच्या सेवनाने आरोग्यालाच नाही तर त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. जाणून घेऊया बदलणाऱ्या वातावरणामध्ये आहारामध्ये दह्याचं सेवन करणं कसं फायदेशीर ठरतं त्याबाबत...पोषक तत्वांचा खजाना सर्वच घरांमध्ये अगदी सहज दही आढळून येतं. पण तुम्हाला माहित आहे का, की दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आढळून येतं. दूधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये दूधाच्या तुलनेत जास्त प्रमाणात कॅल्शिअम असतं. याव्यतिरिक्त दह्यामध्ये प्रोटीन, लॅक्टोज, आयर्न, फॉस्फोरस आढळून येतं. हाडांसाठी फायदेशीर दह्यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. दही खाल्याने दातही मजबुत होतात. दही ऑस्टियोपोरोसिससारखे आजार दूर करण्यासाठीही मदत करतं. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दही पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये ओवा एकत्र करून खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. दही खाल्याने पचन क्षमता वाढते आणि भूकही चांगली लागते. दह्याच्या सेवनाने हृदयाशी निगडीत असणाऱ्या कोरोनरी आर्टरी रोगापासून बचाव होतो. दह्याच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होतं. बदलणाऱ्या वातावणामध्ये फायदेशीर सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी दह्याचा प्रयोग करण्यात येतो. सन स्ट्रोकवर दही अत्यंत उपयोगी ठरतं. वातावरणामध्ये होणारे बदल आणि खोकल्यामुळे श्वसननलिकेला झालेलं इन्फेक्शन होतं. या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी दह्याचा वापर करा. सौंदर्य जपण्यासाठी चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचा मुलायम होते आणि त्वचा उजळण्यासही मदत होते. दह्याने त्वचेवर मसाज केल्याने हे त्वचेवर ब्लीचप्रमाणे काम करतं. याचा वापर केसांसाठी एखाद्या कंडिशनर प्रमाणे करण्यात येतो. उन्हाळ्यामध्ये त्वचेवर सनबर्न झाल्याने त्यावर दही लावणं फायदेशीर ठरतं. ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस एकत्र करून दही लावल्याने चेहऱ्याची कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दही आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या ताकाचा आहारात समावेश केल्याने फायदा होतो. कारण ताक आणि लस्सी प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते. दह्याचे सेवन दररोज केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. माउथ अल्सरवरही दही गुणकार ठरतं. टॅग्स :समर स्पेशलपौष्टिक आहारहेल्थ टिप्सSummer SpecialHealthy Diet PlanHealth Tips